इस्लामपूर येथील साखराळेत राष्ट्रवादीची बैठक…

इस्लामपूर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील हे पालकमंत्री असताना सांगली जिल्ह्यात मॉडेल स्कूल व स्मार्ट पीएचसी प्रकल्प राबविला. त्याची दखल घेत शासनाने संपूर्ण राज्यात ही योजना राबविण्याची घोषणा केली. त्याबद्दल जयंत पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव साखराळे येथे करण्यात आला.साखराळे (ता. वाळवा) येथे १ तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमात पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी मांडलेला हा ठराव टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आला.उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जयंत पाटील यांच्या स्मार्ट पीएचसी आणि मॉडेल स्कूलचा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्याची घोषणा विधानसभेत केली.

त्याबद्दल पक्षाच्या बैठकीत अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. यावेळी माजी सभापती आनंदराव पाटील, सेवादलाचे अध्यक्ष अविनाश पाटील, सरपंच सुजाता पाटील उपसरपंच बाबराव पाटील. महिला जिल्हा उपाध्यक्षा अलका माने, माजी सभापती शैलेंद्र सूर्यवंशी, रामराजे पाटील, सचिन पाटील उपस्थित होते.प्रगतशील शेतकरी विनोद बाबर यांनी ऊसशेतीचे अनुभव सांगितले. अविनाश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी शिवाजी डांगे, वसंतराव माने, मोहन लोहार, पी.बी. सुर्वे, राजेंद्र पाटील, मधुकर जाधव, अमोल पाटील, हणमंत पाटील, जयसिंग डांगे, प्रशांत पाटील उपस्थित होते. सुनील पाटील यांनी आभार मानले.