खानापूर मतदारसंघात विधानसभा उमेदवारीचा नारळ फुटणार का?

विधानसभेची निवडणूक ही काही महिन्यांवरच येऊन ठेपल्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे. खानापूर मतदार संघाचे माजी आमदार सदाशिव पाटील यांचा आज सोमवारी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचे औचित्य साधून ते कोणती घोषणा करतील का? याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून राहिलेले आहे.

विधानसभेच्या निवडणुकीबाबत ते अधिकृत घोषणा करणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार सदाशिव पाटील यांनी दोन वेळा विजय मिळवलेला आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी देखील विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे पाटील गटातून माजी आमदार सदाशिव पाटील मैदानात उतरणार की त्यांचे पुत्र वैभव पाटील निवडणूक लढवणार याबाबत राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे.