भारतीय टपाल विभागात मोठी भरती! ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख!

नोकरीच्या शोधात असणाऱ्या देशातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभागाअंतर्गत ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांच्या एकूण 44,228 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

कधीपर्यंत आहे अर्जासाठी मुदत?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 असणार आहे. विशेष म्हणजे 10 वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी भरतीची मोठी संधी असून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करायचा आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील १० वी पासच्या बेसिस नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर ही तुमच्यासाठी मोठी संधी असणार आहे.

संस्थेचे नाव : भारतीय टपाल विभाग

रिक्त असलेले पद : ग्रामीण डाक सेवक

एकूण रिक्त पद संख्या : 44,228 पदे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे

कसा कराल अर्ज?

भारतीय पोस्ट विभागामध्ये रिक्त असलेल्या ग्रामीण डाक सेवक पदासाठीच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 असणार आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : https://indiapostgdsonline.gov.in/

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.indiapost.gov.in/ ला भेट द्या.