एकनाथ शिंदे याचा मोठा निर्णय!

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपने आधीच आपली यादी जाहीर करून उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितलं आहे.

पण दुसरीकडे शिवसेनेची यादी अद्यापही गुलदस्त्यात आहे. अखेरीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. शिवसेनेची संभाव्य यादी समोर आली आहे. यामध्ये भावना गवळी यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी संजय राठोड यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. तर नाशिकमध्ये एकीकडे भुजबळांना उमेदवारी देण्याची चर्चा आहे तर दुसरीकडे हेमंत गोडसे यांना शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित झाली आहे.

महायुतीमध्ये भाजपने आधीच 18 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनीही सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. अखेरीस आता शिवसेनेतून 12 उमेदवारांची नावं निश्चित झाली आहे. यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये डॉ.श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर यवतमाळ-वाशिममधून भावना गवळी आणि नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्याचं ठरलं असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.