20 सप्टेंबर पासून लागणार आचारसंहिता! विधानसभा निवडणूक ऑक्टोंबरमध्ये

सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीमध्ये प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू असलेले चित्र आपणास दिसत आहे. कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यासाठी तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. तर राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे.

ती म्हणजे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ही 20 सप्टेंबर पासून लागू होणार आहे आणि ऑक्टोंबर च्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता निवडणूक प्रक्रियेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणूक बहुधा एकाच टप्प्यात होईल असे देखील सांगण्यात आलेले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम मतदार यादी 20 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे अशा सूचना देखील निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत. 20 ऑगस्टला मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत.