कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेची नवीन इमारत पूर्ण झाली आहे. त्याचा वास्तुशांती समारंभ अमित शाह यांच्या हस्ते व्हावा, अशी इच्छा मंत्री मुश्रीफ यांची होती.
या सोहळ्यासाठी अमित शाह (Amit Shah) यांना आणण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. यादरम्यान ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मंत्री अमित शाह हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे जवळपास दहा हजार वृक्ष लागवड लावण्याची अट घातली असल्याचे सांगितले जाते. दौऱ्याला येण्यापूर्वी मंत्री मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासमोर जिल्ह्यात दहा हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प ठेवला असल्याचे सांगितले जाते मुश्रीफ यांनी देखील ती अट मान्य केली आहे.