1 ऑगस्टपासून गुगल मॅपने गुपचूप केले बदल……

गुगल मॅपने आपल्या सेवेत काही बदल केले आहेत. येत्या 1 ऑगस्टपासून या बदलाची अंमलबजावणी होणार आहे. भारतासाठी हा बदल फायद्याचा ठरणार आहे. गुगल मॅपने आपल्या शुल्कात घसघसीत कपात केली आहे. ही कपात 70 टक्क्यांपर्यंत आहे. तसेच गुगल मॅपचे शुल्क आता डॉलरमध्येच भरण्याचा आग्रह राहणार नाही. हे शुल्क आता भारतीय रुपयांमध्ये देता येणार आहे. गुगल मॅपला स्पर्धक तयार झाल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे. गुगलच्या स्पर्धेत ओलाने स्वत:चे मॅप आणले आहे. ओला मॅप मोफत युजर वापरु शकतात.

गुगल मॅपच्या या बदलाचा परिणाम सामान्य युजरवर काहीच होणार नाही. परंतु गुगल मॅप तुम्ही व्यवसायासाठी वापरत असल्यास त्याचा फायदा होणार आहे. व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या गुगल मॅपवर शुल्क द्यावे लागते. आता आधीपेक्षा कमी किंमत त्यासाठी मोजावी लागणार आहे. तसेच गुगल मॅप डॉलरऐवजी भारतीय रुपयांमध्ये पैसे घेणार आहे.

गुगल मॅप फ्री असल्याचे तुम्हाला वाटत असेल. परंतु गुगल मॅप सामान्य ग्राहकांसाठी फ्री आहे. व्यवसायासाठी वापरताना त्याला शुल्क द्यावे लागते. एखाद्या रायडींग शेअर कंपनीने त्याचा वापर सुरु केला, तेव्हा त्या कंपनीला गुगल मॅपला पैसे द्यावे लागतात. त्या किंमतीत आता बदल करावे लागत आहे.