विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची रणनिती ठरली…..

राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्र्‍यांनीही या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली.

या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाली.येत्या काही दिवसात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरवली जाणार आहे. यात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रातील भाजपचे सर्वोच्च नेते यांची महत्वाची बैठक होणार आहे.

याच बैठकीत महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 मतदारसंघांच्या जागावाटपाची चर्चा होईल. यानुसार ज्या विधानसभा मतदारसंघात महायुतीतील ज्या पक्षातील उमेदवाराची जिंकण्याची क्षमता सर्वाधिक असेल, त्यालाच मेरीटनुसार महायुतीकडून उमेदवारी दिली जाईल, अशी रणनिती या बैठकीत आखण्यात आली.