पंचगंगा पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने उघडकीप दिली आहे. गेल्या २४ तासात पाणी पातळी ०५ इंचाने वाढली. शनिवारी सकाळी ९ वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी ४७ फूट ०२ इंच होती.रविवारी सकाळी ९ वाजता पाणी पातळी ४७ फूट ०७ इंचावर पोहोचली आहे. २४ तासात पंचगंगेची पाणी पातळी ०५ इंचाने वाढली.शनिवारी रात्री ९ पासून रविवार पहाटे ५ पर्यंत ०८ तास पंचगंगगेची पाणी पातळी ४७ फूट ८ इंचावर स्थिर होती.
सकाळी ६ वाजता पाणी पातळी १ इंचाने कमी होऊन ४७ फूट ७ इंच झाली आहे. गेले तीन तास पाणी पातळी स्थिर आहे. कसबा बावडा एमआयडीसी-शिरोली (शिये) मार्गावर तस्ते ओढा येथे रस्त्यावर पाणी आले आहे. पाणीपातळीत वाढ झाल्याने वाहतूक बंद केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 1 इंचाने घट झाली आहे. सततच्या पावसामुळे(rain) निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत आता काहीशी सुधारणा झाली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीला मोठा पूर आला होता, ज्यामुळे परिसरातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले होते. नदीच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि आपत्कालीन स्थितीशी तोंड देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे.