भारतीय क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे बुधवारी (31 जुलै) रात्री निधन झाले आहे. 71 वर्षीय गायकवाड हे दीर्घ काळापासून ब्लड कॅन्सरने त्रस्त होते. अंशुमन गायकवाड यांची अवस्था पाहून विश्वविजेता कर्णधार कपिल देव मदतीसाठी पुढे आला.
त्यांनी इतरांनाही मदतीचे आवाहन केले. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अंशुमन गायकवाडच्या उपचारासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यांच्यावर इंग्लंडमधील रुग्णालयात उपचार सुरू होते.
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांच्या निधनाने क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे. माजी क्रिकेटपटूंसह जय शहा आणि पंतप्रधान मोदींनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत हळहळ व्यक्त केले आहेत.अंशुमन गायकवाडने 1974 मध्ये भारताकडून पदार्पण केले. त्यांनी भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले. गायकवाड आणि सुनील गावस्कर यांची जोडी 1970 च्या दशकात हिट ठरली होती.
गायकवाडने आपल्या कसोटी कारकिर्दीत 1985 धावा केल्या. त्यानी 1983 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 201 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, जी त्याची सर्वोच्च धावसंख्याही होती. अंशुमन गायकवाड 1975 आणि 1979 च्या विश्वचषकातही टीम इंडियाचा भाग होते.