1 ऑगस्टपासून बदलणार हे नियम……

नवीन महिना सुरू झाला की, वेगवेगळ्या प्रकारचे नियम बदलत असतात. बँकांबद्दल त्याचप्रमाणे सिलेंडरच्या दरामध्ये, सोने, चांदीच्या दरांमध्ये त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड या सगळ्या गोष्टींमध्ये काही ना काही बदल होत असतात.परंतु त्यातले काही नियम असे असतात. जे सर्वसामान्य माणसांच्या खिशावर अतिरिक्त भार वाढतात. अशातच आता 1 ऑगस्ट पासून काही नियम बदलणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य माणसांना होणार आहेत. आता ते कोणते नियम असणार आहेत? हे आपण जाणून घेऊया.

एलपीजी गॅसची किंमत

1 ऑगस्ट 2024 पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठा बदल होऊ शकतो. दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती यातील कंपन्या बदलत असतात. त्यामुळेच दर महिन्याला एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत बदलली जाते. जुलैमध्ये 19 किलोच्या व्यवसाय सिलेंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली होती. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातही सिलेंडरची किंमत कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

उपयुक्तता व्यवहारिक नियम

जुलैमध्ये क्रेडिट कार्ड द्वारे उशिरा पेमेंट विज बिल भाडे आणि इतर गोष्टींमध्ये बदल केलेले होते. तुम्ही महाविद्यालय किंवा शाळेच्या वेबसाईटवरून थेट पेमेंट करू शकत नाही. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कोणताही थर्ड पार्टी वापरून पेमेंट करावे लागेल. तुम्ही जर हे पेमेंट केले तर तुम्हाला 1 टक्के शुल्क भरावे लागेल. परंतु याची व्यवहार मर्यादा ही 3हजार रुपये एवढी आहे.

HDFC बँक क्रेडिट कार्ड नियम

1 ऑगस्ट 2024 पासून एचडीएफसी च्या बँकेच्या नियमांमध्ये काही बदल होणार आहे. ते म्हणजे आता बँकेकडून टाटा न्यू इन्फिनिटी आणि टाटा न्यू प्लस या क्रेडिट कार्डमध्ये बदल केले जाणार आहेत. त्यामुळे या कार्डधारकांना टाटा व्यवहारांवर 1.5 नवीन नाणी मिळणार आहेत.

EMI प्रक्रिया शुल्क

आता तुम्ही जर उशिरा EMI केला तर तुम्हाला 299 पर्यंत चार्ज भरावा लागणार आहे. एचडीएफसी बँकेच्या मते हे शुल्क जीएसटी अंतर्गत आहे. तुम्ही जर बँकेतून कोणताही थर्ड पार्टी पेमेंट ॲप द्वारे पेमेंट केले, तर तुम्हाला एक टक्का शुल्क भरावे लागणार आहे.

गुगल मॅप नियम

गुगल मॅपने देखील 1 ऑगस्टपासून काही नवीन नियम लागू केलेले आहे. कंपनीने आता भारतातील त्यांच्या सेवांचे शुल्क 70% पर्यंत कमी आलेले आहे. तसेच गुगल मॅप आता त्यांच्या सेवेसाठी डॉलर्स ऐवजी भारतीय रुपयांमध्ये शुल्क आकारणार आहे.