सध्या पाऊसाने जोर धरलेला आहे. अनेक भागात पाऊस आपली हजेरी लावत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतच आहे. गेल्या पंधरा दिवसातील मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली म्हणजेच नदीच्या पात्राबाहेर पाणी जात असल्यामुळे अनेक नदीकाठच्या लोकांच्या शेतामध्ये पाणी आल्यामुळे सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे.
बुधवारी पावसाने थोडीफार विश्रांती घेतली थोडेसे पाणी संथ गतीने उतरत होते त्यातच पुन्हा बुधवारी सकाळी राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडले गेले त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक पुन्हा एकदा सुरू झाली. हातकणंगले तालुक्यातील चंदूर, पट्टणकोडोली, इंगळी, रांगोळी, रेंदाळ मधील अनेक पिके ही पाण्याखाली गेल्यामुळे खूपच नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. महापुराची भीती निर्माण झालेली नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे.
