श्रीलंकेला मोठा धक्का! अष्टपैलू वानिंदू हसरंगा स्पर्धेबाहेर….

सध्या भारताचा पुरुष क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. श्रीलंकेत भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत संपला आहे. आता दुसऱ्या सामन्यात विजयी कामगिरी करण्याचे लक्ष या दोन्ही संघांपुढे असणार आहे. असे असतानाच आता श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या सामन्यात भारताचे तीन गडी नामोहरम करणारा वानिंदू हसरंगा हा दिग्गज गोलंदाज उर्वरीत दोन सामन्यांना मुकणार आहे. म्हणजेच आता वानिंदू हसरंगा आगामी दोन सामने खेळू शकणार नाही. याच कारणामुळे आथा श्रीलंकेची चिंता वाढली आहे. 

वानिंदू हसरंगाला सध्या दुखापत झालेली आहे. त्यामुळे तो आगामी दोन सामन्यांत खेळू शकणार नाही. त्याच्या मांडी आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. 2 ऑगस्ट रोजी कोलंबोत झालेल्या एकदिवसीय सामन्यात त्याला ही दुखापत झाली होती. 

संघात वानिंदू हसरंगा नसणे हे श्रीलंकेच्या संघासाठी मोठी हानी असल्याचे म्हटले जात आहे. कारण गोलंदाजी विभागातील दुष्मंथा चमीरा, मथीशा पथिराना, दिलशान मधुशंका हे दिग्गज खेळाडू संघाचा भाग नसतील. अशा स्थितीत वानिंदू हसरंगा हा श्रीलंकेचा हुकुमी एक्क होता. आता हे तिन्ही खेळाडू संघाच्या बाहेर असल्याने श्रीलंकेचा संघ कमजोर होऊ शकतो. वानिंदू हसरंगाच्या जागवेर आता श्रीलंकेच्या संघात जेफरी वेंडरसेला सामील करून घेतले जाईल. याबाबतची अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे.  

वानिंदू हसरंगा श्रीलंकन संघात नसल्यामुळे भारताला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आगामी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.