मनोज जरांगे पाटील यांची कोल्हापुरात 9 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मिरजकर तिकटी येथील क्रांतीस्तंभाला अभिवादन करून मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे.
या रॅलीमध्ये गावागावातील मराठा समाजातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती सकल मराठा समाज कोल्हापूर जिल्ह्याचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यासोबतच या रॅलीमध्ये मराठा समाजातील बंधू भगिनींनी भगवी टोपी आणि हातात भगवे झेंडे घेऊन सहभागी व्हावे ,असे आवाहनही करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.