भारत सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजना राबवण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने या योजना राबवण्यात येतात.त्यातील एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करतात. २०१८ साली ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले जातात. वर्षातून तीन वेळा प्रत्येकी २-२ हजार रुपये दिले जातात. या योजनेत तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. तर आता या योजनेचा १८ वा हप्ता देण्यात येणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेत वार्षिक ६००० रुपये दिले जातात. प्रत्येक चार महिन्यांनी हा हप्ता दिला जातो. हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांना देण्याची शक्यता आहे.