पक्षातील फुटीमुळे जागावाटपात बदललं गणितं….

लोकसभा निवडणुकांमधील निकालाचा विचार केल्यास सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी 8 मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळालं आहे. त्यामुळे, भाजप-सेना युतीचे 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 असे एकूण 10 आमदार सोबत असतानाही महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाल्याने सोलापूर जिल्ह्याचं राजकारण विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वेगळ्याच वळणावर असल्याचं दिसून येत आहे. राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकांवेळी भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये थेट लढत होती.

मात्र, यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद् महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. या लढतीत शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यामुळे विधानसभेच्या जागावाटपात मोठा तिढा निर्माण होणार आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या 11 विधानसभा निवडणुकांचं जागावाटप करताना तिन्ही पक्षांपुढे अडचणी निर्माण होणार आहेत.