विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचालींना सुरुवात केलीय. बैठका, चर्चा, संवाद यात्रा सुरु झाल्या आहेत. अशातच विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा देखील प्लॅन ठरला आहे. काल रात्री (8 ऑगस्ट) महायुती समन्वय समितीची मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यामध्ये राज्यात महायुतीचे समन्वय मेळावे आणि संवाद दौरे होणार आहेत.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सभा घेण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. या महिनेच्या 20 तरखेपासून सातही विभागमध्ये दौरे सुरु होणार असल्याची माहिती भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.रात्री मुंबईत महायुतीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
राज्यात महायुतीचे समन्वयचे मेळावे आणि संवाद दौरे होणार आहेत. प्रत्येक विधानसभेत एक सभा घेण्याचं निर्णय घेण्यात आला आहे. या महिनेच्या 20 तरखेपासून सातही विभागमध्ये दौरे सुरु होतील. या सातही विभागांमध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा होणार असल्याची माहिती लाड यांनी दिली. आठवी आणि शेवटी जाहीर सभा मुंबईत होणार आहे.