Mpox ची जगभरात दहशत, भारताच्या वेशीवर भयानक आजार…

मंकीपॉक्सने जगभरात दहशत निर्माण केली आहे. युरोप आणि आशियामध्ये मंकीपॉक्सने आजाराने हाहाकार माजवला आहे. आजार धोकादायक स्थितीत पोहोचल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने MPOX ला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. दरम्यान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मुंबई विमानतळावर चाचणी आणि क्वारंटाईन सुविधा सुरू करण्यास सांगितलं आहे.

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोच्या आरोग्य मंत्रालयाच्या महामारीविषयक रिपोर्टनूसार, आरोग्य मंत्री रॉजर काम्बा म्हणाले की, 2024 च्या सुरुवातीपासून या देशात 15,664 लोकांना मंकीपॉक्सची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे, तर यातील 548 लोकांचे आजाराने प्राण घेतले आहेत. देशातील सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये इक्वेटूर, साउथ किवु, साउथ उबांगी, संकुरु, त्शुआपा, मोंगला आणि त्शोपो यांचा समावेश आहे. आफ्रिकेबाहेर, युरोपमधील स्वीडन आणि आशियातील पाकिस्तानमध्येही एमपीक्सची प्रकरणे नोंदवली गेली असल्याची माहिती समोर येत आहे. याचा अर्थ हा आजार भारताच्या वेशीवर आला आहे. त्यामुळे भारतीयांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे.