थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी..

 जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी ही तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे बंपर भरतीला लवकरच सुरूवात होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. विशेष बाब म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. खरोखरच ही मोठी संधी आहे. ही एक प्रकारची बंपर भरतीच आहे. एनएलसी इंडिया लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. एनएलसी इंडिया लिमिटेड ही कंपनी केंद्र शासनाची नवरत्न कंपनी आहे.

एनएलसी इंडिया लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जातंय. डिप्लोमा आणि इंजिनीअरिंग करून सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपण 18 जानेवारी 2024 पासून अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2024 आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. nlcindia.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलचे सर्व अपडेट हे आरामात मिळतील. इच्छुक उमेदवारांनी उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

एनएलसी इंडिया लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया 632 पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी पदवीधर आणि तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. यापैकी 314 पदे पदवीधर शिकाऊ उमेदवारासाठी आणि 318 पदे तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ पदासाठी आहेत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी आहे.

पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिस पदांसाठी निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. अप्रेंटिसशिपचा कालावधी एक वर्षाचा असेल. कंपनी 19 फेब्रुवारी 2024 रोजी निवडलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करेल. यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी केली जाईल. चला तर मग नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.