राज्यात गेल्या दोन दिवस जोरदार पाऊस पडतोय. वादळी वाऱ्यासह हा पाऊस होत असून काही तास पडणाऱ्या पावसामुळे नगरिकांची त्रेधा उडत आहे. रविवार प्रमाणेच सोमवारी देखील पाऊस झाला.सोमवारी नाशिक आणि पुण्यात झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. दरम्यान, आज देखील हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाटासह हा पाऊस होणार आहे.दरम्यान, आज देखील या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धारशिव या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना आज मंगळवारी देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.