10वी-12वी उत्तीर्ण असाल तर एसटी महामंडळात आहे नोकरीची मोठी संधी!

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत सध्या भरतीच्या नोटिफिकेशन काढल्या जात असून वेगवेगळ्या विभागा अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.इतकेच नाही तर केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील आता रेल्वे, बँकिंग क्षेत्र व त्यासोबतच संरक्षण दलाशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या भरती प्रक्रिया सध्या राबवण्यात येणार असून काही भरती प्रक्रियांसाठीच्या अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे.

या पदांसाठी होणार भरती

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेतून लिपिक, सहाय्यक तसेच शिपाई या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून 68 रिक्त पदांसाठी ही भरती केली जात आहे.

अर्जकरण्यासाठी आवश्यक वयोमर्यादा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या माध्यमातून लिपिक तसेच सहाय्यक व शिपाई पदाच्या 68 जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले असून या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 18 ते 35 दरम्यान असणे गरजेचे आहे.

इतकेच नाही तर उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की ही भरती कंत्राटी पदांसाठी केली जात आहे.

निवड झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वेतन मिळणार आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत ज्या रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड होईल त्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग, विभागीय कार्यालयात नोकरी करावी लागणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील त्यांनी या भरतीसाठी अर्ज करणे गरजेचे आहे.