लखनौ सुपर जायंट्स संघात इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये बदलाचे संकेत मिळत आहेत. सोमवारी कर्णधार लोकेश राहुल आणि संघ मालक संजीव गोएंका यांच्यात बैठक पार पडली.स्टार यष्टिरक्षक-फलंदाज लोकेश राहुल याला लखनौ सुपर जायंट्स आगामी IPL 2025 साठी संघात कायम ठेवणार आहे, परंतु त्याला कर्णधारपद देणार नसल्याचे स्पष्ट आहे. IANS ने दिलेल्या वृत्तानुसार कर्णधाराच्या दबावामुळे लोकेशला त्याच्या खेळावर लक्ष केंद्रीत करता येत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच त्याला या जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे.
काही रिपोर्टनुसार LSG त्याला रिटेने ठेवण्याची शक्यता कमी आहे. पण, IANS ने दिलेल्या सूत्रांच्या हवाल्यानुसार KL Rahul याला संघ कायम राखेल, परंतु कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करतील. कृणाल पांड्या आणि निकोलस पूरन ही दोन नावं LSG च्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत. CEO संजीव गोएंका यांच्यासोबत त्याची अधिकृत मिटींग होती. यात या दोघांमध्ये कर्णधारपद व रिटेनशीप यावर चर्चा झाली.
दरम्यान, राहुलला फक्त फलंदाज म्हणून संघासाठी योगदान द्यायचे आहे आणि त्यामुळे त्याला कर्णधारपदी कायम राखण्याची शक्यता कमी आहे. गोएंका यांनी लोकेशवर पूर्ण विश्वास दाखवला आहे आणि ते त्याला खेळाडू म्हणून रिटेन करण्यासाठी तयार आहेत. पण, तो कर्णधारपदी दिसणार नाही हे फ्रँचायझीच्या एका सूत्राने IANS ला सांगितले.