रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार का?

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीच्या निमित्ताने शरद पवार यांना भेटत आहेत.लोकसभेतील पवार-मोहिते पाटील यांचा राजकीय डाव यशस्वी झाल्यानंतर विधानसभेला काय चित्र असणार याची उत्सुकता आहे. विजयदादांचे चिरंजीव तथा भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, याची उत्सुकता आहे.

त्याबाबत विजयदादांनी आपल्याला त्याबाबत माहिती नाही, असे उत्तर दिले आहे.ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अगोदर विजयसिंह मोहिते पाटील व्हीएसआयमध्ये दाखल झाले. त्या वेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitshinh Mohite Patil) भाजपध्ये असून सध्या ते विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा होत असते.

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये राहणार की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात येणार? असा प्रश्न माजी खासदार विजयसिंह मोहीते पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मला त्याबाबत माहिती नाही, असे सांगितले. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या राजकीय निर्णयाबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.