राजकोट किल्ल्यावर मविआ-भाजप कार्यकर्ते भिडले, जयंत पाटलांची मध्यस्थी….

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला होता. यानंतर राजकीय वर्तुळात विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसताय. दरम्यान, सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आजच भाजप खासदार नारायण राणे, नितेश राणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी पोहोचले .

मात्र त्याचवेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेही दाखल झालेत. तर पोलिसांनी नारायण राणेंना मुख्य प्रवेशद्वाराबाहेर थांबवून ठेवल्याने नितेश राणे आणि भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. यावेळी भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने आलेत इतकंच नाहीतर राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांच्या राड्यात जयंत पाटलांनी मध्यस्थी केली आणि वाद मिटवला.