हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस; विविध मुद्यांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. महायुती सरकारचे हे पहिले हिवाळी अधिवेशन नागपूरात होत आहे.काल अधिवेशनच्या पहिल्या दिवशी ईव्हीएमसह अनेक मुद्यांवर विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस असून विविध मुद्द्यांवरुन विरोधक आज पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.