राज्यात विधानसभेला कोणता पक्ष कोणती जागा लढणार? खासदार शिंदेंनी….

इचलकरंजीत जनसंवाद दौर्‍यानिमित्त आलेल्या खा. डॉ. शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कागल, करवीर, कोल्हापूर शहर, इचलकरंजी, हातकणंगले, शाहूवाडी, शिरोळ, राधानगरी अशा विविध विधानसभेच्या मतदारसंघनिहाय बैठका पार पडल्या. सरकारकडून काय अपेक्षा आहेत, याची माहिती घेण्यात आली. शिवसेना कोणत्या जागांवर याआधी लढली आहे, कोणाची किती तयारी आहे, विद्यमान आमदारांची स्थिती काय आहे, याचा सर्व अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला जाईल.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडून कोणी कोणत्या ठिकाणी लढायचे, हा निर्णय घेतला जाईल.लोकसभेत विरोधकांनी अपप्रचार केला, तरीही हातकणंगलेची जागा विजयी करण्यात यशस्वी ठरलो.

कोल्‍हापुरात महायुतीसाठी चांगले वातावरण आहे. ज्या कार्यकर्त्यांना कोठे नियुक्ती हवी आहे, ती दिली जाईल.’ राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते.