Ladki Bahin Yojana:लाडकी बहीण योजनेत मोठा बदल; आता याच महिलांचे अर्ज मंजूर होणार

राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहे. जुलै महिन्यापासून ही योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या अकउंटला पैसे जमा झाले आहेत तर अजूनही अनेक मपहिलांना पैसे आले नाही.दरम्यान राज्य सरकारने या योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूर केले जाती, असा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाने याबाबत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या या नवीन नियमानुसार फक्त अंगणवाडी सेविकाच या योजनेच्या अर्जांना मंजुरी देते.याआधी योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे काम ११ प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आले आहे. मात्र, आता या निर्णयात बदल करण्यात आला आहे.

आता फक्त अंगणवाडी सेविकाच या अर्जांना मंजूर देऊ शकणार आहेत.मागील काही दिवसांमध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या नावाने ३० अर्ज दाखल केले होते. त्यातील २६ अर्ज मंजूरदेखील झाले होते. त्यामुळेच राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यातील अर्जांना केवळ अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूरी मिळणार आहे.