दिवाळीचा सण अतिशय जल्लोषात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. वसुबारस आणि धनत्रयोदशीनंतर वेधतात ते छोटी दिवाळी म्हणजे नरक चतुर्दशीचे. यादिवशी दिवाळीची पहिला आंघोळ केली जाते.मराठी पंचांगानुसार आश्विन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते.
यंदा पंचांगानुसार आश्विन कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 30 ऑक्टोबर 2024 ला बुधवारी दुपारी 01:15 पासून दुसऱ्या दिवशी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:52 वाजता चतुर्दशी तिथी असणार आहे. अशामध्ये नरक चतुर्दशी कधी साजरा करायची याबद्दल संभ्रम आहे.उदय तिथीनुसार, नरक चतुर्दशी 31 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. याच दिवशी दिवाळीची पहिली आंघोळ करायची आहे. यादिवशी पहाटे उठून उटणं तेल लावून अभ्यंगस्नान करतात. त्यानंतर नवीन कपडे घालून फराळावर ताव मारला जातो. त्यालाच छोटी दिवाळी असं म्हटलं जातं.