कॉस्मेटिक सर्जरीदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू, २९ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

प्रसिद्ध अभिनेत्री आणि ब्राझीलची मॉडेल लुआना आंद्राडेचे निधन झाले आहे. अभिनेत्रीने २९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ७ नोव्हेंबरला दुपारी तिचं निधन झालं. अभिनेत्री ‘पॉवर कपल ६’, ब्राजीलियाई टीव्ही शो, डोमिंगो लीगलमध्ये स्टेज असिस्टंट म्हणून ओळखली जात होती. लुआनाला कॉस्मेटिक सर्जरी करणं महागात पडलं आहे. त्यामुळेच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिपोसक्शन सर्जरीदरम्यान लुआनाला चार वेळा हृदयविकाराचा झटका आला. ती साओ पाउलोची रहिवासी होती. ब्राझीलचा फुटबॉल स्टार नेमारसह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी लुआना आंद्राडेच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली. फुटबॉलपटू नेमारने लुआनालाबद्दल एक्सवर ट्विट करत लिहिले की, ‘माझी मैत्रिण लुआनाचा मृत्यू झाला आहे. तिच्या संपूर्ण कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.’

सॅन लुइस हॉस्पिटलमध्ये लिपोसक्शन सर्जरीदरम्यान लुआना आंद्रेडचा मृत्यू झाला. कॉस्मेटिक सर्जरीदरम्यान लुआनाला अचानक श्वास घेण्यास त्रास झाला आणि तिला हृदयविकाराचा झटका आला. ज्यामुळे शस्त्रक्रिया थांबवण्यात आली. त्यानंतर आयसीयूमध्ये तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. पण पहाटे साडेपाच वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

लुआनाच्या निधनानंतर रुग्णालय प्रशासनाने आपले निवेदन जारी केले आहे. रुग्णालयाने सांगितले की, सर्जरीमध्ये व्यत्यय आला. चाचण्यांमधून “मॅसिव्ह पल्मोनरी एम्बोलिझम” दिसून आले. हृदयविकाराच्या झटक्यानंतर लुआनाला आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. जिथे तिला औषधोपचार आणि हेमोडायनामिक उपचार देण्यात आले होते.”

शल्यचिकित्सक डिओव्हान रुआरो यांच्या म्हणण्यानुसार, तपासणीदरम्यान लुआना आंद्रेडची प्रकृती ठीक होती.ऑपरेटिव्हपूर्व सखोल तपास करण्यात आला. दुर्दैवाने आम्ही तिला वाचवू शकलो नाही याचे आम्हाला दुःख होत आहे. कधीकधी लिपोसक्शन प्रक्रियेवेळी अशी घटना घडत असतात.