अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, छोट्या पडद्यावर मात्र कायम सक्रिय आहे. गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री अनेक शोमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा माधुरी हिला एका सीनचा पश्चाताप वाटू लागला होता. वयाच्या 20 व्या वर्षी अभिनेत्री स्वतःपेक्षा 20 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत किसिंग सीन शूट केले होतं. पण तेव्हा इंटिमेट सीन शुट करताना अभिनेत्याचा ताबा सुटला… ज्याचा पश्चाताप आजही अभिनेत्रीला होतो.
सध्या ज्या सिनेमाची चर्चा रंगत आहे, त्या सिनेमाचं नाव ‘दयावान’ असं आहे. ‘दयावान’ सिनेमात माधुरी दीक्षित हिने अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती. तेव्हा विनोद खन्ना अभिनेत्रीपेक्षा 20 वर्ष मोठे होते. सिनेमात दोघांवर किसिंग सीन शूट करण्यात आला होता.
किसिंग सीन शुट होत असताना अभिनेत्याचा स्वतःवरचा ताबा सुटला. यावर माधुरीने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला होता, ‘माझ्या कुटुंबाचा इंडस्ट्रीसोबत काहीही संबंध नव्हता. म्हणून मला ठावूक नव्हतं इंडस्ट्रीमध्ये कसं काम चालतं. त्यामुळे ‘दयावान’ सिनेमात मला किसिंग सीनसाठी नकार देता आला नाही.’‘दयावान’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर माधुरीला स्वतःचीच लाज वाटू लागली होती. ज्यामुळे अभिनेत्रीने मोठ्या पडद्यावर किसिंग सीन करण्यास नकार दिला. आता मागे वळून पाहते तेव्हा वाटतं आता याबद्दल मौन बाळगणं योग्य ठरेल..’ आज अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.