महाविकास आघाडीत जागा वाटपाविषयी काय फॉर्म्युला आहे, याची कार्यकर्त्यांमध्ये जितकी उत्सुकता आहे, तितकीच ती सत्ताधाऱ्यांना पण आहे. निवडणुकीतील रणनीती काय असेल यावर खलबतं सुरू आहेत. एकाच जागेवर तीन पक्षांचा दावा असेल तर तिथे काय तोडगा निघतो याकडे इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. आज बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी याविषयीचे काही ठोकताळे सांगितले.
सध्या इच्छुकांची रीघ लागली असून त्यांच्या मुलाखतीनंतर निवड करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.हितचिंतक येत असतात, ही लोकशाहीची पद्धत आहे. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये केवळ एका ठिकाणी निर्णय बसून घेण्याच्या ऐवजी विविध सहकाऱ्यांची मते लक्षात घेऊन सगळ्याचा अभ्यास करून महत्वाच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे इच्छुक आहेत त्यांचा अभ्यास चालू आहे. पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांची काही वरिष्ठ नेत्यांची टीम आहे, ते याबाबत योग्य निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.ही निवडणूक तीन पक्ष एकत्रित येऊन लढणार आहोत.
राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे एकत्रित लढणार आहोत. तीन पक्ष एकत्रित लढणार म्हणजे यात कोणतीही एक जागा असेल ही जागा कोण लढवणार, याबाबत याची चाचपणी सुरू असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. लवकरच तिन्ही पक्षातील लोक एकत्र बसून जागा वाटपाबाबत प्रक्रिया संपेल. आम्ही लवकरच तिन्ही पक्षाची एकत्रित बैठक घेणार आहोत, आणि त्या एका विचाराने बैठकीत निर्णय घेणार आहोत. याबाबत आमची बैठक झालेली नाही. येत्या आठ दिवसांत ही बैठक पार पडेल, असे त्यांनी स्पष्ट केले.