मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढा तालुक्यात पावसाला सुरुवात

मागील पंधरा दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस शुक्रवारी रात्रीपासून पुन्हा सुरू झाला आहे. आज रविवारी दुपारी 3 च्या सुमारास मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.शुक्रवारी सकाळी ते शनिवारी सकाळी साडेआठपर्यंत १.३ मिलिमीटर तर शनिवारी दिवसभरात ५.२ मिमी पाऊस पडला.

शनिवारी दिवसभर रिमझिम पाऊस पडला तरी पुढील पाच दिवस यलो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे. पाऊस पडत असला तरी सोलापुरात शनिवारी ३२.५ डिग्री तापमान नोंदवले गेले. या पावसामुळे जनजीवनावर अंशतः परिणाम झाला. शुक्रवारी तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी पडल्या. शनिवारी दुपारी मुसळधार पाऊस पडला.सोलापुरात आगामी काही दिवसांत होणाऱ्या पावसाचा अंदाज पाहता पुढील पाच दिवस यलो अलर्ट हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे.या कालावधीत समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. वाऱ्यांचा वेग वाढण्याचा अंदाज आहे.