Ration Card e KYC : ई केवायसी करा, अन्यथा रेशन कार्ड बंद! जाणून घ्या कशी करायची ई केवायसी?

आता शासकीय योजनेच्या लाभार्थी असलेल्या प्रत्येकाला ई केवायसी (Ration Card e KYC) करणे अनिवार्य आहे. मग आधार असो, बँकेचे काम असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यावयाचा असो, प्रत्येक ठिकाणी ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे.

प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आताई-केवायसी (e KYC) करणे बंधनकारक झाले आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई- केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रेशनकार्ड (ration Card) धारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेशनकार्ड धारकांना रेशन दुकानातून धान्य मिळते. याच धान्य दुकानात ई केवायसी करण्याची सोय आहे.या रेशन दुकानदारांकडे फोर-जी ईपॉस मशीन आहेत, या मशीनद्वारे ही केवायसी केली जाते.यासाठी आधार कार्ड घेऊन जाणे. या ठिकाणी या मशीनमध्ये आधार क्रमांक टाकला जातो.यानंतर संबंधित व्यक्तीच्या बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.

सर्वांत अगोदर प्ले स्टोअरमध्ये जाऊन मेरा राशन हे अँप डाऊनलोड करात्यानंतर अँप चालू करून तुमचा रेशनकार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकण्यासाठी पर्याय दिसेल.आधार किंवा शिधापत्रिका यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून सबमीट या बटणावर क्लिक करा.त्यानंतर आधार सिडिंग या ऑप्शनवर यावे.

त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सिडिंग Yes किंवा No असा ऑप्शन दिसेल.ज्या सदस्याच्या नावापुढे येस हा ऑप्शन असेल, त्या सदस्याला ई-केवायसी करण्याची गरज नाही. आणि ज्या सदस्याच्या नावापढे नो असा ऑप्शन असेल, त्या सदस्याला ई-केवायसी करावी लागेल.ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.