दसऱ्याच्या दरम्यान महाविकास आघाडीचा जागावाटप जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती, महाविकास आघाडीची आज जागा जागावाटपावर सलग दुसऱ्या दिवशी बैठक महाविकास आघाडी याच आठवड्यात संपूर्ण जागावाटप पूर्ण करणार, त्यानंतर दसऱ्याच्या जवळपास तिन्ही पक्ष मिळून एकत्रित जागावाटप जाहीर करणार आहेत. यादरम्यान चर्चेअंती अजूनही काही जागांवर महाविकास आघाडीमध्ये तिढा राहिल्यास साधारणपणे १७५ ते २०० जागा ज्यावर महाविकास आघाडीचे एक मत झाला आहे या जागांचं जागावाटप महाविकास आघाडी कडून दसऱ्याच्या दरम्यान जाहीर केले जाईल.
काल विदर्भातील काही जागांवर पुन्हा एकदा चर्चा करण्यात आली. मुख्यत्वे करून नागपूर,वर्धा आणि बुलढाणा या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीची चर्चा झाल्याची माहिती आहे विदर्भातील जागा संदर्भात पहिल्या टप्प्यातील बैठकीमध्ये एकूण 12 जागांवर तिढा होता बारा पैकी सहा जागांचा तिढा सुटला असून आता उरलेल्या सहा जागांवर पुन्हा एकदा आज महाविकास आघाडीच्या आघाडी चर्चा होणार असल्याची माहिती आहे, शिवाय विदर्भातील उर्वरित जिल्ह्यातील जागांवर सुद्धा पुन्हा एकदा चर्चा होईल.
विदर्भातील ज्या काही मोजक्या जागांवर महाविकास आघाडीमध्ये तिढा आहे आणि ज्याची चर्चा सुरू आहे यामध्ये काही जागा या शिवसेना ठाकरे गटाच्या पारंपारिक लढत असलेल्या जागा आहेत ज्यावर काँग्रेसचा दावा आहे. तर काही जागा काँग्रेसच्या ताकद असलेल्या आणि पारंपारिक जागा आहेत येथे ठाकरे गटाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे ज्या काही मोजक्या जागांवर तिढा निर्माण झाला आहे त्या जागांवर मेरिटनुसार निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगण्यात येतय.