आगामी विधानसभा निवडणुकीत हातकणंगलेची जागा…

आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. कोणत्याही तारखेस आचारसंहिता लागू शकते आणि त्यानंतर मग विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशातच प्रत्येक पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. सध्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या घडामोडींना खूपच वेग आलेला दिसून येत आहेत.

हातकणंगलेची जागा काँग्रेसने लढवली तर अधिक धोका आहे असा अहवाल राज्य कार्यकारणीकडे गेल्यानंतर जागांची अदलाबदल करण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झालेले आहेत. महाविकास आघाडीला एक एक जागा महत्त्वाची आहे त्यामुळे ही अदलाबदल सुरू असल्याचे बोलले जात आहे.

परंपरागत काँग्रेसची इचलकरंजी जागा शरद पवार यांना सोडण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे तर हातकणंगलेची जागा ठाकरे सेनेला सोडल्यास महाविकास आघाडीच्या एका आमदाराची भर पडेल असा चर्चेचा सुरू होता. विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनीही जिल्ह्यातील एखाद्या जागेची अदलाबदल होऊ शकते असे संकेत देखील दिले होते.

माजी खासदार जयवंतराव आवळे यांचे गांधी घराण्याची निकटचे संबंध आहेत त्यामुळे राहुल गांधी हे आमदार राजू बाबा आवळे यांच्या उमेदवारीसाठी साकडे घालू शकतात. परंतु महाविकास आघाडीत पक्षाच्या उमेदवारापेक्षा महाविकास आघाडी म्हणून निवडून येण्याचे मेरिट कुणाकडे आहे हे पाहिले जाणार आहे.

या जागेसाठी राहुल गांधी फारसे आग्रही राहतील असे सध्यातरी दिसत नाही. ही जागा ठाकरे सेनेला सोडल्यास डॉ. सुजित मिनचेकर निश्चित निवडून येतील असा अहवाल महाविकास आघाडीकडे गेल्यानेच या जागेवरील दावा काँग्रेसकडून सोडण्याच्या हालचाली सध्या तरी सुरू आहेत.