इचलकरंजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून चार ते आठ ऑक्टोंबर रोजी…..

नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजी अंतर्गत हातकणंगले व शिरोळ कार्यालयामार्फत नवीन दोन चाकी एमएच ५१ डी नोंदणी मालिकेचे 4 ऑक्टोंबरपासून कामकाज सुरू करण्यात येत आहे. नवीन दोन चाकी पसंती क्रमांकाचे अर्ज चार ते आठ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते दोन या वेळेत कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत. वाहनधारकांनी वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करतेवेळी काही नियमांचे पालन देखील करणे आवश्यक आहे.

त्यामध्ये पसंती नोंदणी क्रमांक घेण्यासाठी वाहनधारक हा हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील असणे आवश्यक आहे. पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मूळ रकमेचा डिमांड ड्राफ्ट जोडलेला असणे आवश्यक आहे.