सुप्रिया सुळे राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील का?

राज्याच्या राजकारणात अनेकदा महिला मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा रंगतात. यामध्ये सर्वात आधी खासदार सुप्रिया सुळेंचं नाव घेतलं जातं. त्यावर आज शरद पवारांनी भाष्य केलं आहे. यामध्ये सर्वात आधी खासदार सुप्रिया सुळेंचं नाव घेतलं जातं. त्यावर आज शरद पवारांनी एबीपी माझाच्या माझा महाकट्टावर भाष्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) अध्यक्ष शरद पवार शरद पवार यांना आगामी निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू आहे, एक बाप म्हणून आणि एका पक्षाचे अध्यक्ष म्हणून काय वाटतं असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, इथं काहीही झालं तरी राज्य सरकार आमच्या लोकांच्या हातात आलं पाहिजे आणि आम्ही ते आणणार.

आणि एकदा हे ठरवलं की अ ब क व्यक्ती महत्वाची नाही. तो एकत्र  निर्णय होईल. अर्जुनाला जसा माशाचा डोळा, तशी आमच्या मनात महाराष्ट्राची सत्ता, बाकी काही नाही. तर याच प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला संसदेत महाराष्ट्राचा मधु दंडवते होण्याची फार इच्छा आहे. जिथे त्यांचं नाव आहे तिथे नेहमी मला असं वाटतं की आपलं देखील नाव त्या बोर्डावर लागलं पाहिजे.