नदीत दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु

अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील भीमकुंड नदीत दोघा बहीणींना अज्ञातांनी फेकुन दिल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. या दोघी बहीणी काल दुपारपासून घरी न आल्याने त्या हरविल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी काल दाखल केली होती. परंतू या बहिणींना नदीच्या पात्रात फेकल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी पाणबु्ड्यांच्या मदतीने नदीच्या पात्रात शोध सुरु केला आहे. रात्रीची वेळ असल्याने शोधकामात अडथळे येत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातल्या लाखनवाडा गावातल्या दोन अल्पवयीन मुली काल दुपारपासून घरी न आल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही मुली सख्या बहीणी असून एकीचे वय 9 तर दुसरीचे वय 7 वर्षे असल्याचे सांगण्यात येते. या संदर्भात या मुली घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी काल सायंकाळी उशीरा दोघी बहिणी बेपत्ता असल्याची तक्रार बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस ठाण्यात दाखल केली. कालपासूनच बुलढाणा पोलिसांनी या दोन्ही मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

दोघी बहीणी आपले आधारकार्ड अपडेट करण्यासाठी गेल्या होत्या. परंतू त्या घराकडे परतल्या नसल्याने आई-वडीलांना नातलगांकडे विचारपूस केली. मुलीच्या संभाव्य जाण्याच्या सर्व ठिकाणी चौकशी करुनही काहीच सुगावा न लागल्याने पालकांनी पोलिसांत धाव घेतली. या संदर्भात पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात काही धागेदोरे हाती लागले आहे. या मुलींना त्यांच्या नातेवाईकांनीच नदीत फेकल्याचा संशय पोलिसांना आला आहे. त्यामुळे पोलिसांनी नदीच्या पात्रा सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. नदीपात्र आणि परिसरात बचाव पथका मार्फत शोध मोहीम सुरु असुन या मुलींची नावे आलिया आणि सदफ अशी असल्याचे सांगण्यात येते.दरम्यान या प्रकरणात एकाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.