Ayushman Bharat Yojana : मोठी बातमी; ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदवार्ता! आजारांवर पण आता मोफत इलाज

पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेचा विस्तार होत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मोठी आनंदवार्ता आहे. सरकार लवकरच याविषयीचा घोषणा करू शकते. या योजनेत सध्या काही रोगांवर इलाज करण्यात येतो. त्यात काही असाध्य आणि इतर आजारांचा समावेश नाही. पण सरकार आता इतर आजारांचा पण या योजनेत उपचारांचा लाभ देण्याची शक्यता आहे. अल्जाईमर, डिमेशियासह इतर अनेक आजारांचा खर्च योजनेतंर्गत करण्यात येईल.

अजून सरकारने याविषयीची अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. केंद्र सरकारने 70 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या सर्व वयोवृद्धांना या योजनेत सहभागी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता इतर असाध्य व्याधींवर मोफत इलाज करण्यासाठी योजनेचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे.नुसार, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) या योजनेतंर्गत बदल करण्याचे निश्चित केले आहे. अजून इतर व्याधी, आजारांचा या पॅकेजमध्ये समावेश करण्यात येणार आहे. वयोमानानुसार येणाऱ्या आजारपणाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

वयानुसार या आजारांचा वृद्धांना सामना करावा लागतो. या आजारांच्या समावेशानंतर या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सध्या या योजनेत 25 आजारांचा समावेश करण्यात आला आहे.TIO ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेच्या समीक्षेसाठी तज्ज्ञांची एक समिती काम करते. ही समिती AB-PMJAY चे नियमित परिक्षण आणि समीक्षा करते. या योजनेत आता वयोवृद्धांवर अधिक लक्ष्य केंद्रीत करण्यात येत आहे.

ही समिती वाढत्या वयानुसार येणाऱ्या आजारांवर अधिक लक्ष्य देत आहे. योजनेत अशा रोगांचा अजून समावेश करण्यात येत आहे, ज्यामुळे रुग्णालयात उपचारांची गरज आहे. त्यामुळे निदान झाल्यावर त्वरित उपचार मिळण्याची सुविधा मिळेल. स्ट्रोक, हॉर्ट फेलिअर, कँसर, अल्झायमर आणि डिमेंशिया यासह इतर रोगांचा नव्याने समावेश होण्याची शक्यता आहे.