अभिनेता रितेश देशमुख याचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस मराठी 6’ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बिग बॉसने स्पर्धक दिव्या शिंदे हिला अचानक घरातून बाहेर काढलं आहे. त्यामुळे घरातील सदस्यांना आणि दिव्या हिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सांगायचं झालं तर, एका टास्क दरम्यान, दिव्या हिने स्पर्धक तन्वी हिला धमकी दिल्यानंतर घरातील वातावरण बिघडलं…
तन्वी हिने दिव्याला नॉमिनेट केल्यामुळे दिव्या हिचा पारा चढला… त्यानंतर दिव्या हिने थेट तन्वी हिच्यावर तलवार चालवण्याची धमकी दिली… एवढंच नाही तर, बिग बॉसने दिव्या हिला स्वतःती चूक सुधारण्याची देखील धमकी दिली. पण दिव्या हिने माफी मागितली नाही. अशात, इतर सदस्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बिग बॉसने दिव्याला दंड म्हणून तातडीने बाहेर काढलं.
बिग ब़ॉसने हाकलल्यानंतर दिव्या हिच्या टीमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या दिव्या हिच्या टीमकडून शेअर करण्यात आलेली पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये खूप काही सांगायचं आहे… असं लिहिलं आहे… सध्या सर्वत्र दिव्या हिच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.
पोस्टमध्ये काय म्हणाली दिव्या शिंदे?
दिव्या हिच्या टीमकडून पोस्ट शेअर करण्यात आली आहे. “आम्ही समजू शकतो की, ‘बिग बॉस मराठी’ शोमधून दिव्या शिंदेची एक्झिट झाल्यामुळे अनेक लोक भावुक झालेत आणि अनेकांना धक्का देखील बसला आहे. पण तुमचं प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी सर्वकाही आहे. आम्ही तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. पण सर्वांना एक विनंती करतो, कृपया कोणीही या घटनेबाबत चुकीची माहिती किंवा नकारात्मकता पसरवू नका. तुम्हाला खूप काही सांगायचं आहे. आम्ही लवकरच सर्व प्रश्नांची उत्तरं देत आमची बाजूही मांडू”
काय म्हणाली दिव्या शिंदे…
दिव्या म्हणाली, “मी या घराबाहेर ‘सरकार’ म्हणून वावरते आणि माझ्या हातात कायम एक तलवार असते. आता ती तलवार घरी आहे, याचा अर्थ असा नाही की मी इथल्या गोष्टी विसरेन. बाहेर गेल्यावर मी ती तलवार चालवेन. ती कोणावर चालेल, हे तुम्ही माझ्याबद्दल काय बोलता यावर ठरेल.” एका रिअॅलिटी शोमध्ये अशा प्रकारे जीवे मारण्याची धमकी देणं हे बिग बॉसच्या नियमावलीच्या पूर्णपणे विरोधात होतं.
