दसरा सणाच्या तोंडावर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जागतिक पातळीवर इराण आणि इस्रायल देशातील युद्धाच्या परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारानी आपली गुंतवणूक सोन्याच्याकडे वळविल्याने मागणीत वाढ होऊन सोन्याचे दर हे जीएसटीसह 78000 रुपयांच्यावर पोहोचले होते.मात्र, गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर 76600 रुपयांच्या खाली असल्याने ऐन दसऱ्याच्या तोंडावर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं पाहायला मिळत आहे.
Related Posts
एक सप्टेंबरपासून हे ॲप्स होणार बंद!
गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे ज्याच्या मदतीने लोकांचे काम सोपे होते. पण आता गुगल 1 सप्टेंबरपासून आपल्या…
धुळवडीला रंग आणि पाण्यापासून स्मार्टफोनला वाचवा
भारतात होळी आणि राज्यात रंगपंचमीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पण या रंगोत्सवाला नुकसानीचे गालबोट लागायला नको. पाणी आणि रंगांच्या विना…
आमदार अपात्रता प्रकरणावर आज ‘सर्वोच्च’ सुनावणी! शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आज फैसला होणार?
शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आमदार अपात्रता प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष…