अज्ञात चोरट्याने शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेतील 30 ते 35 किलो सुमारे चार हजारावर रुपये किमतीचे डाळिंबे चोरून नेल्याची घटना उघडकीस आलेली आहे. दत्तात्रय भिमराव माळी राहणार जुनोनी तालुका सांगोला यांची जुनोनी तालुका सांगोला येथे गट नंबर 613 मध्ये 33 गुंठे मध्ये डाळिंब बाग आहे. फिर्यादी माळी हे सोमवारी सायंकाळी सहा वाजता मिरज येथे कामानिमित्त गेले होते. मंगळवारी ते जुनोनी येथे आले. दरम्यान त्यांनी डाळिंब बागेत जाऊन बागेची पाहणी केली असता त्यांना दहा ते बारा झाडावरील डाळिंब कमी दिसू लागले. त्यामुळे त्यांनी डाळिंबा बाबत आजूबाजूला चौकशी केली असता त्याची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांची खात्री झाली की आपल्या बागेतील झाडावरील 30 ते 35 किलो डाळिंब सुमारे 4500 रुपये किमतीची डाळिंबे कोणीतरी चोरून नेली आहेत. याबाबत दत्तात्रय माळी यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगोला पोलिसात फिर्याद दाखल केलेली आहे.
Related Posts
आता पशुपालनासाठी मिळणार 12 लाखापर्यंत कर्ज! कसा घ्याल लाभ?
शेतीसोबतच पशुपालन हेही शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. त्यामुळं बहुतांश शेतकरी आता पशुपालनही करतात. यासाठी सरकार आर्थिक मदतही करते. नाबार्ड…
पालक शेतीचा अनोखा प्रयोग! लाखोची कमाई
अलिकडच्या काळात अनेक तरुण शेतकरी प्रयोगशील शेती करताना दिसत आहेत. कमी खर्चात लाखो रुपयांचा नफा कमावत आहेत. आज आपण अशाच काही…
सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात!
बदलत्या वातावरणामुळे डाळिंबावरील मर व तेलकट रोगामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी पुरते हवालदील झाले आहेत.डाळिंबावर पडलेल्या मर व तेलकट रोगामुळे उध्वस्त…