भारतविरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्समध्ये रंगला ज्यात भारताचा पाच विकेट्सने पराभव झाला. आता दुसरा सामना बर्मिंगहॅममध्ये रंगणार आहे. या सामन्याचे नाणेफेक हे इंग्लंडने जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या संघात मोठा बदल पाहायाला मिळाला.
दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या या सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे. भारतीय संघाने जसप्रीत बुमराहचा (Bumrah) अंतिम 11 खेळाडूंमध्ये समावेश केलेला नाही, तर कुलदीप यादवचाही अंतिम 11 खेळाडूंमध्ये समावेश केलेला नाही. भारताच्या संघात जसप्रीत बुमराहच्या जागेवर आकाश दीप, शार्दुल ठाकुरच्या जागेवर वॉशिंग्टन सुंदर आणि साई सुदर्शनच्या जागेवर नितीश कुमारे रेड्डी संघात सामील झाला आहे. दुसरीकडे, इंग्लंडने आधीच आपला अंतिम 11 खेळाडू जाहीर केला होता, ज्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
टीम इंडियाने आतापर्यंत एजबॅस्टनमध्ये एकही सामना जिंकलेला नाही. जर आपण एजबॅस्टन स्टेडियमवरील भारतीय संघाचा रेकॉर्ड पाहिला तर तो अजिबात चांगला नाही. त्यांनी येथे एकूण 8 सामने खेळले आहेत, त्यापैकी 7 सामने गमावले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. अशा परिस्थितीत, टीम इंडियासाठी हा सामना सोपा राहणार नाही, जर या सामन्यातही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तर ते मालिकेत 2-0 ने मागे पडतील आणि नंतर त्यांच्यासाठी पुनरागमन करणे खूप कठीण होईल.