महिला पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा……..

राज्य सरकारने महिला पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. गरोदर काळात महिला पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना साडी नेण्यास सरकारने परवानगी दिली आहे.या बाबतचा आदेश सरकारने बुधवारी काढला आहे. दरम्यान, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना गर्भधारणेचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. यानंतर डीजीपी कार्यालया तर्फे संबंधित महिला कर्मचाऱ्याला साडी नेसण्याची परवानगी दिली जाणार आहे.

राज्य सरकारने महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर साडी नेसण्याची परवानगी दिली आहे. या साठी गर्भधारणेचे वैद्यकीय प्रमाणपत्र संबंधितांना सादर करणे आवश्यक आहे. गर्भधारणेचे पाहिले काही महीने काळजी घेणे गरजेचे असते. या काळात महिलांनी पोटावर बेल्ट घातल्यास याचे गंभीर परिणाम संबंधित महिलेच्या तब्बेतीवर किंवा गर्भधरनेवर होऊ शकतात. तसेच गणवेश घळण्यातही अडचणी येतात.

महिला पोलिस कर्मचाऱ्यांची ही अडचण पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.हा निर्णय गर्भवती आणि प्रसूतीनंतर महिला पोलिस अधिकाऱ्यांना दिलासा देणारा आहे. कारण गर्भवती असतांना अनेक महिलांना गणवेश आणि त्यावर बेल्ट घालणे अवघड जात होते. तसेच या काळात पोटातील बाळाला देखील त्रास होण्याची शक्यता होती. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे आता गर्भवती महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.