राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. आता पर्यंत लाखो बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. परंतु अजूनही कागदपत्रांच्या अभावी काही भगिनी या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत.दरम्यान, या योजनेत सुरुवातीला अर्ज दाखल करण्याची ३१ ऑगस्ट तारीख होती.
परंतु महिलांच्या वाढत्या प्रतिसादामुळे अर्ज दाखल करण्याची तारीख ३१ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, या मुदतीतही अनेक महिलांनी काही कारणांमुळे अर्ज दाखल केले नव्हते. पण अशा महिलांना आता अर्ज दाखल करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महिलांना लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.