लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची उरले फक्त तीनच दिवस

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदतवाढ केली होती. परंतु आता काही महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याने सरकारने 15 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख ठेवलेली आहे.

विधानसभा निवडणुकीचा विचार करता राज्य सरकार अनेक योजना आणत आहेत. आणि महिलांना याचा जास्त फायदा देत आहे. अशातच राज्य सरकारने जुलै महिनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळाले. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे 3 हजार रुपये ऍडव्हान्स मध्ये महिलांना मिळालेले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. सध्या दिवाळीनिमित्त सरकारकडून भाऊबीज दिली जात आहे