स्वातंत्र्य दिनी खलिस्तानी संघटना कट रचत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी हायअलर्ट जारी केला असून 15 ऑगस्ट रोजी खलिस्तानी संघटना दिल्लीत ठिकठिकाणी खलिस्तानी घोषणा असलेले पोस्टर लावू शकतात.
विशेष टार्गेट ठेवून खलिस्तानी दहशतवादी कृत्य करु शकतात, अशी गुप्त माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली आहेत.खलिस्तान्यांचा गैरकृत्याच्या कटासंदर्भात गोपनिय माहिती मिळाल्यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर दिल्ली पोलिस सतर्क झाले आहेत.
दिल्ली पोलिस आयुक्तांनी याबाबत उच्चस्तरीय बैठकही घेतली आहे.या बैठकीनंतर दिल्ली पोलिसांचा विशेष कक्षही सुरक्षेच्या दृष्टीने कामाला लागला आहे. सुरक्षाव्यवस्था चोख ठेवून कोणत्याही स्थितीत 15 ऑगस्टच्या धर्तीवर गाफील राहायचे नाही म्हणून सुरक्षायंत्रणा दक्ष झाली आहे.