Instant Chakli Recipe: दिवाळीसाठी 10 मिनिटांत बनवा कुरकुरीत चकली

लवकरच दिवाळीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नवरात्रीपासूनच त्याच्या तयारीला सुरुवात होते. ज्यामध्ये घराच्या साफसफाईपासून ते फराळ बनविण्यापर्यंत अनेक गोष्टीचा समावेश होतो.

भाजणीच्या चकलीला पर्याय म्हणून एक कुरकुरीत चकली रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ही चकली अगदी 10 मिनीटांत तुम्ही बनवू शकता. चला तर मग, येत्या दिवाळीला काही मिनिटांत तयार होणारी अशी कुरकुरीत चकली बनविण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या.

रेसिपी

तांदळाची चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये 1 कप पाणी उकळत ठेवा. या पाण्यात बटर, जिरे, काळे तीळ आणि मीठ टाका.

त्यानंतर या पाण्यात तांदळाचे पीठ घाला. हे पीठ एकदम टाकू नका. थोड्या थोड्या प्रमाणात पीठ घालत ढवळत रहा, जेणेकरून पिठाच्या गाठी होणार नाही. यानंतर पीठ 2 मिनिटे चांगले शिजवा. त्यानंतर गॅस बंद करून 5 मिनिटे झाकून ठेवा. आता तयार झालेले पीठ पुन्हा एकदा चांगले मळून घ्या.

त्यानंतर चकलीचा साचा घ्या, त्याच्या आतून बटर किंवा तेल लावून घ्या. त्यानंतर हे पीठ साच्यात घालून चकल्या पाडून घ्या. या चकल्या नॉन स्टिक पॅनमध्ये गरम तेलात सोनेरी रंगाच्या होईपर्यंत खरपूस तळून घ्या. अशाप्रकारे तुम्ही येत्या दिवाळीसाठी कुरकुरीत तांदळाची चकली बनवून ठेवू शकता.