संकष्टीनिमित्त बनवा मूग डाळीचे मोदक

आज बुधवार संकष्टी चतुर्थी असून बाप्पासाठी अनेकजण मोदक बनवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मूग डाळीचे मोदक कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

साहित्य : 2 कप मूग डाळ, 3 कप तांदळाचे पीठ, 50 ग्राम गूळ,1 चमचा वेलची पूड, 2 मोठे चमचे पीठी साखर,1 कप दूधचिमुटभर मीठ

कृती :

सर्वप्रथम गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करा आणि त्यामध्ये गूळ घालून मध्यम आचेवर 5 मिनिटांपर्यंत ठेवा.जेव्हा गूळ पाण्यामध्ये पूर्ण पणे वितळून जाईल तेव्हा अर्धा कप दूध आणि वेलची पूड एकत्र करून मध्यम आचेवर 5 मिनिटांपर्यंत शिजवा.आता या मिश्रणामध्ये मूग डाळ आणि एक कप पाणी मिक्स करून भांड्याला झाकूण ठेवा.

त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेऊन डाळ शिजवून घ्या. आणि गॅस बंद करून हे मिश्रण गार करा.आता दुसऱ्या भांड्यामध्ये तांदळाच्या पीठामध्ये साखर आणि मीठ मिक्स करा. गरम पाणी ओतून पीठ मळून घ्या.

आता त्या पीठाचे छोट्या गोल पुऱ्या करा आणि त्यामध्ये मूगाचे मिश्रण भरा आणि त्याला मोदकाचा आकार द्या.अश्या पद्धतीने सगळे मोदक तयार करून घ्या.आता ते मोदक उकडून घ्या.तयार मोदक ताटामध्ये काढून बाप्पाला नैवेद्य दाखवा.