पंचगंगा नदी पात्रात मगरीचा वावर

 इचलकरंजी,पंचगंगा नदीच्या पात्रात रविवारी एकजण बुडाल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागास मिळाली. त्यानंतर त्याचा शोध घेताना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मगरीचे दर्शन झाले. 

याबाबत माहिती अशी कि, हत्ती चौक परिसरातील एकजण पंचगंगा नदीत बुडाल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या कर्मचाऱ्यांना समजली.त्यानुसार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी दिवसभर त्याचीशोध मोहीम राबविली. दरम्यान, सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान काळ्या ओढ्याचे पाणी ज्याठिकाणी पंचगंगा नदी येऊन मिसळते त्याठिकाणी असलेल्या बेडक्याळे यांच्या शेताजवळ लहान मगर नदीपात्रात येत असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मधील कर्मचाऱ्यांना दिसले. त्यांनी आपली बोट आणखी पुढे घेतली असता मोठी मगर नदी पात्रालगत बसल्याचे दिसून आले. मगर आढळून आल्याने पंचगंगा नदीपात्रात मगरीचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. आप्तकालीन विभाग प्रमुख संजय कांबळे यांचेसह हरीष कांबळे, शितल ज्योती, देवानंद कांबळे, शाक्यानंद कांबळे, अविनाश काकडे याप्रसंगी उपस्थित होते.